'हर घर तिरंगा'च्या सिंधुदुर्ग संयोजकपदी संदिप गावडे

Edited by: विनायक गांवस
Published on: August 06, 2025 18:07 PM
views 86  views

सावंतवाडी : 'हर घर तिरंगा' या अभियानाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी युवा नेते संदिप गावडे यांची निवड झाली आहे. भारतीय जनता पार्टी तर्फे दि ०४ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा या अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.  जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी 'हर घर तिरंगा' या अभियानाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी युवानेते संदिप गावडे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आजरोजी जाहीर केले. या अभियानंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात येणार आहे.