संदीप गावडे यांचा अनोखा उपक्रम !

वेंगुर्लेतील 44 भजनी मंडळांना सलग दुसर्‍या वर्षी भजन साहित्य भेट
Edited by: दिपेश परब
Published on: August 25, 2025 18:11 PM
views 61  views

वेंगुर्ला :  कोकणातील भजनी कलेचा वारसा जपण्याकरिता दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मतदारसंघात भजनी साहित्यचे वितरण करण्यात येते यावर्षी वेंगुर्ले तालुका कार्यालयात ४४ भजनी मंडळांना प्रोत्साहनपर साहित्याचे वाटप भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे यांच्या माध्यमातून करण्यात आले. 

याप्रसंगी बोलताना जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे यांनी नमूद केले की दरवर्षी हा उपक्रम आपण या तिन्ही तालुक्यात करणार आहोत आणि आपला उद्देश कोकणी भजन कलेस प्रोत्साहन देण्याकरिता आहे. 

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आपल्या भाषणात नमूद केले की भजनातला 'भ' याप्रमाणे आपल्या जीवनात भाषा, भुषा, भवन,भ्रमण, भक्ती, भजन असे  'भ' चे महत्व आहे, त्या आचरणाने चालल्यास आपला देश स्वदेशी, आत्मनिर्भर असा समर्थ भारत निर्माण होईल . यातील भ- भजन कला जोपासण्यासाठी संदिप गावडे यांनी पुढाकार घेतला तो कौतुकास्पद आहे. असाच अभिनव उपक्रम दरवर्षी करण्याचा संकल्प करावा याकरिता त्यांनी शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न देसाई यांनी करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी भजन मंडळांना २५००० रु अनुदान दिल्याबद्दल आभार मानले , तसेच गणेशोत्सव हा सण राज्य महोत्सव म्हणून घोषित केल्याबद्दल महायुती सरकार चे आभार व्यक्त केले . या कार्यक्रमाचे आभार तालुकाध्यक्ष पप्पू परब आणि माजी नगराध्यक्ष गिरप यांनी केले. 

याप्रसंगी सर्वच भजनी मंडळांनी साहित्य संदीप गावडे यांच्या हस्ते देण्यात आले आणि पुढील वर्षी नवीन मंडळांना प्रोत्साहन देण्यात येईल असे सुतोवाच केले.

यावेळी जिल्हा निमंत्रीत सदस्य साईप्रसाद  नाईक, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पडवळ, युवा मोर्चा अध्यक्ष प्रणव वायंगणकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण परब, तालुका सरचिटणीस वसंत तांडेल,  तालुका उपाध्यक्ष दीपक नाईक , युवा तालुका सरचिटणीस वैभव होडवडेकर, शक्ती केंद्र प्रमुख गुरूनाथ मडवळ - गणेश गावडे - सुधीर गावडे - विजय बोवलेकर - महादेव नाईक , सायमन आल्मेडा , सुभाष सावंत , विजय बागकर , राहुल गावडे , नामदेव सरमळकर , सत्यविजय गावडे , आनंद गावडे , सुनील घाग, तुषार साळगांवकर , सुर्यकांत परब , अर्जुन साळगावकर , जयेश साळगावकर , संतोष अणसुरकर, सचिन वस्त , सुभाष खानोलकर, नारायण गावडे , सत्यवान पालव , प्रदीप मुळीक , मुकुंद नाईक, आदी कार्यकर्ते उपस्थित होते .

यावेळी ब्राम्हण सेवा भजन मंडळ साळगावकर वाडी वायंगणी , माऊली भजन मंडळ वरची केरवाडी शिरोडा , वेताळ प्रासादिक भजन मंडळ  तुळस , श्री देव ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ वरचा सावंतवाडा , श्री महापुरुष भजन मंडळ वजराठ , श्री देवी इसवती ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ पालकरवाडी , देसाईवाडी  भजन मंडळ परबवाडा , विठ्ठालादेवी  भजन मंडळ  न्हाईचीआड , पिंपाळेश्वर भजन मंडळ मडकील अणसुर , मौलादेवी भजन मंडळ मोचेमाड होळकरवाडी , श्री देव दाडोबा प्रासादिक भजन मंडळ  वेतोरे वरचीवाडी , गजानन प्रासादिक भजन मंडळ परबवाडी, होडावडा , भराडी भजन मंडळ कोचरे , जय गणेश भजन मंडळ परूळे गवाण, श्री कुलस्वामी प्रासादिक भजन मंडळ आंबेगाळी , शांतदुर्गा भजन मंडळ म्हापण मडवळवाडी , श्री देव लोपादर भजन मंडळ आडेली , श्री देवी गव्हाणी प्रासादिक भजन मंडळ वायंगणी नांदरुखवाडी , श्री देव गवळदेव प्रासादिक  भजन मंडळ दाभोली कांदळकरवाडी , श्री देव सातेरी भजन मंडळ फौजदारवाडी तुळस , गिरेश्वर सातेरी तळेकर प्रासादिक भजन मंडळ वजराठ , श्री देव वंश ब्राम्हण बागकर वाडा भजन मंडळ , सिद्धिविनायक  प्रासादिक  भजन मंडळ मळई , माटेकर मित्रमंडळ रामजीवाडी आरवली , गोठणेश्वर  भजन मंडळ  रामघाट रोड , साकवेश्वर प्रासादिक भजन मंडळ ,  कुलदेवता  भजन मंडळ खानोली , मुंडये वल  प्रासादिक  भजन मंडळ शेळपी, श्री सागरतीर्थ भजन मंडळ , श्री देवी शर्वाणी भजन मंडळ , भूमिका देवी भजन मंडळ पाल, खाजणादेवी भजन मंडळ पाल, महापुरुष भजन मंडळ, वरचे बांबर मातोंड , गावठण  नवारवाडी भजन मंडळ उभादांडा , ब्राम्हण भजन मंडळ सुखटणवाडी, श्री देव घुमटेश्वर प्रासादिक वारकरी भजन मंडळ नवाबाग , धावडेश्वर भजन मंडळ वेंगुर्ला , बोवलेकरवाडी  भजन मंडळ, नवकला वारकरी भजन मंडळ, श्री ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ , श्री देव हेळेकर  भजन मंडळ  कांबळीवाडी उभादांडा आडारी , ढोकमेश्वर भजन मंडळ वेंगुर्ला शहर , वांद्रेश्वर कला क्रीडा मंडळ , सुंदरभाटले. इत्यादी मंडळींना प्रोत्साहन पर भजन साहित्य देण्यात आले.