
सावंतवाडी : सावंतवाडी ते चराठा या मुख्य रस्त्याला जोडणारे पूलाच्या कामाला अखेर मंजूरी मिळाली. या पूलाची उंची कमी असल्याने पुलाचे काम होणे खूपच आवश्यक होते. पावसाळ्यात शाळेतील व त्या भागातील जनतेची गैरसोय होत होती.
या कामाला मंजुरी मिळाल्याने अखेर ग्रामपंचायत सदस्य अमर चराठकर यांच्या चार वर्षाच्या पाठपूरावयाला अखेर यश मिळाले. त्यामुळे बांधकाम उपअभियंता श्री सगरे यांची भेट घेऊन आभार मानण्यात आले. यावेळी उपसरपंच अमित परब, अमर चराठकर, सूरेश गावडे, दर्शन धूरी, विनोद मसूरकर उपस्थित होते.