
सावंतवाडी : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे आयोजित तालुका व महानगरपालिका स्तरावर प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज निबंध स्पर्धा २०२४ आयोजित करण्यात आली होती. तालुकास्तरावरील या निबंध स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावीच्या गटातून इयत्ता आठवीतील कुमारी समृद्धी गंगाराम शेळके हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तिच्या या यशाबद्दल प्रशालेतर्फे तिचे अभिनंदन करण्यात आलं.