
कणकवली :कणकवली तालुक्यातील सम्मेद प्री- स्कूल या पूर्व प्राथमिक शाळेचा शाळा गुणवत्ता मानांकन प्रमाणपत्र प्रदान सोहळा नुकताच संपन्न झाला. पूर्व प्राथमिक शाळा मान्यता परिषद भारत यांच्यामार्फत शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थी सुरक्षा, भौतिक साहित्याची उपलब्धता, अध्यापन पद्धती, शिक्षक - पालक सहयोग अशा विविध निकषांच्या मूल्यांकनानंतर हे मानांकन देण्यात आले आहे. या सोहळ्यात पालकांची मनोगते विशेष लक्षवेधी ठरली. विशेष विद्यार्थी पालकांनी आपल्या पाल्याची प्रगती अधोरेखित करत भावनिक प्रतिक्रिया दिल्या. या कार्यक्रमास शाळेच्या संचालिका सन्मती ब्रह्मदंडे, पूर्व प्राथमिक शाळा मान्यता परिषद भारतच्या तालुका विस्तार अधिकारी रूपाली कदम, महिला सल्लागार साक्षी गावडे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.