कणकवलीत सन्मान कोकणचा मिम्स स्पर्धेचं आयोजन...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 16, 2024 12:59 PM
views 46  views

कणकवली : सन्मान कोकणचा, कोकणकरांचा.. येवा कोकण आपला आसा या टॅगलाईन खाली सन्मान कोकणचा ही मिम्स स्पर्धा 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता कणकवली येथे हॉटेल निलम्स कंट्रीसाईड्स येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजपा आमदार नितेश

राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गसौंदर्य स्थळे जगासमोर आणण्यासाठी अभिनव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी लक्षद्वीप आणि मालदीव विषय देशात गाजत असताना भारत देश कसा सुंदर आहे हे पंतप्रधान मोदी यांनी दाखवून दिले होते. त्याचवेळी आपला निसर्गसुंदर सिंधुदुर्ग आणि कोकणचे पर्यटन सौंदर्य जगासमोर मांडण्याची संकल्पना मनात आली. त्याचवेळी यू ट्युबर्स इन्फ्लुअर्स ची जागतिक पातळीवर सुरू असलेल्या ताकदीला एकत्र आणण्यासाठी मिम्स आणि रिल्स ची स्पर्धा कणकवलीत संपन्न होत आहे. या माध्यमातून कोकणचे निसर्गसौंदर्य जगासमोर मांडण्यासाठी 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता निलम्स कंट्रीसाईड्स येथे कोकण सन्मान

रिल्स आणि मिम्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. क्रिएटर्सनि आपले रिल्स आणि मिम्स 20 फेब्रुवारी पर्यंत

पाथवायच्या आहेत. 20 फेब्रुवारी सकाळी 8 ते 22 फेब्रुवारी रात्री 9 वाजेपर्यंत वोटिंग लाईन्स सुरू असणार आहेत. अंकिता प्रभू वालावलकर, गौरी पवार, मंगेश काकड, वृषाली जावळे, रोहन शहाणे, गणेश वनारे, प्रसाद विधाते, कुहू परांजपे, श्रुती कोळंबेकर, प्रशांत नागती, शंतनू रांगणेकर आदी स्टार निमंत्रित या कार्यक्रमासाठी उपलब्ध होणार आहेत. हे सर्व स्टार क्रिएटर्स सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळे, निसर्ग स्थळांना भेट देऊन त्या ठिकाणी रिल्स तयार करणार आहेत. जनतेसाठी यू ट्यूब लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याद्वारे सर्वजण हा कार्यक्रम पाहतील असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.