
दोडामार्ग : दक्षिण कोकण कृषी समाज मंडळाचे माध्यमिक विद्यालय झोळंबेचे सहाय्यक शिक्षक, हिंदी विषयाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ अध्यापक, आपल्या मितभाषी स्वभावाने गेली अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेत्तर पतपेढीवर दोडामार्ग तालुक्यातून संचालकपदी निवडून आलेले, विद्यमान दोडामार्ग तालुक्यातून जिल्हा खुला प्रवर्ग मधून निवडून आलेले, शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा सचिव, मळगांवचे रहिवासी समीर रमाकांत परब यांची पतपेढी अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
दोडामार्ग तालुक्यातील प्रत्येक शिक्षकाच्या अडीअडचणीला धावून जाणारे समीर परब यांची निवड सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक पतपेढी वर झाल्यामुळे सर्व शिक्षकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निवडीबद्दल शिक्षक भारतीचे राज्य कार्यवाहक संजय वेतूरेकर, चौकेकर सर तसेच शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत आडेलकर,सी.डी.चव्हाण सर तसेच मुख्याध्यापक नाईक यांनी विशेष अभिनंदन केले आहे.










