वैश्य समाज पतसंस्थेच्या संचालकपदी समीर वंजारी

Edited by: विनायक गांवस
Published on: December 29, 2023 16:39 PM
views 175  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेतृत्व व वैश्य समाजाचे युवा संघटक समीर वंजारी यांची सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सह.पतसंस्था मर्या. फोंडाघाटचे संचालक म्हणून निवड झाली आहे. माणगाव खोरे, सावंतवाडी तालुका व दोडामार्ग तालुका यातून ते निवडून आलेत. सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.