
सावंतवाडी : सावंतवाडी प्रांताधिकारीपदी समीर भीमराव घारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी प्रांताधिकारी पदाचा कार्यभार हाती घेतला आहे.
श्री घारे यांनी नवी मुंबई निवडणूक विभाग तहसीलदार पदावरून त्यांची पदोन्नतीने सावंतवाडी प्रांताधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी कणकवली मालवण तहसीलदार पदावर काम केले आहे. कोकण विभागात ठाणे, कल्याण, रायगड तहसीलदार पदी त्यांनी काम केले आहे.










