मुक्ताईच्या 'आवाज - अभिनय' कॅम्पला संभाजी सावंतांची भेट

Edited by: विनायक गांवस
Published on: May 03, 2025 16:48 PM
views 125  views

सावंतवाडी : मुक्ताई ॲकेडमी आणि व्हिजन, मुंबई यांच्या सहकार्याने शालेय विदयार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या "आवाज व अभिनय" कार्यशाळेला सुप्रसिदध नाट्य लेखक, दिग्दर्शक संभाजी सावंत यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि त्यांचे मित्र जयप्रकाश सावंत होते.


कार्यशाळेला जिल्ह्यातील मुलांचा मोठ्या प्रमाणात मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांनी मुलांचे आणि मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांचे कौतुक केले.लहान मुलांसाठी सुरु केलेल्या या उपक्रमासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. संभाजी सावंत यांनी मुलांना मार्गदर्शन करताना वाचनाचे महत्त्व सांगितले.वाचनाबरोबरच कसं बोलावं, एकमेकांशी संवाद कसा करावा हे उदाहरणांसहीत स्पष्टं केले.कार्यशाळेचे मार्गदर्शक श्रीनिवास नार्वेकर आणि मार्गदर्शिका स्वरुपा सामंत मुलांसाठी बरीच वर्षे काम करतात, त्याचा लाभ मुलांनी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.मुलांनी ही भेट संस्मरणीय असल्याचे सांगितले.