सामंत ट्रस्ट तर्फे गरजू व्यक्तींना धनादेश प्रदान

Edited by: विनायक गावस
Published on: December 09, 2023 19:15 PM
views 156  views

सिंधुदुर्ग :  मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल रुग्णांच्या नातेवाइकांना आज सावंतवाडी येथील डॉ परूळेकर नर्सिंग होम येथे प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

असनिये, सावंतवाडी येथील अनिता सावंत, गोविंद म्हाडेश्वर, नकुल सावंत, शंकर सावंत, उत्तम सावंत अशा एकूण पाच रुग्णांना त्यांच्या औषधोपचारासाठी तसेच आकेरी येथील संजय वालावलकर या कर्करोगाने पिडित रुग्णासाठी आणि मातोंड येथील शांती खाजणेकर या संधिवाताने ग्रस्त वृध्द महिलेसाठी अशा एकूण सात लाभार्थ्यांना हे धनादेश देण्यात आले. या प्रसंगी बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत उपस्थित होते.