सामंत ट्रस्टकडून गरजू रूग्णांना मदत

Edited by: विनायक गांवस
Published on: June 20, 2024 10:49 AM
views 105  views

सावंतवाडी : सामंत ट्रस्ट तर्फे सावंतवाडी येथील डॉ. परूळेकर नर्सिंग होम येथे गरजू रूग्णांना मदत सुपुर्द करण्यात आली. पाच गरजू लाभार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश माजी नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.  आर्थिक परिस्थिती नसलेल्या आणि औषधोपचार न परवडणाऱ्या अनेकांना सामंत ट्रस्ट आधार देईल असं मत डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले.

सावंतवाडी येथे सामंत ट्रस्ट तर्फे मदत करण्यात आली. नेमळे,हरिजनवाडी येथील हातावरील शस्त्रक्रिया झालेल्या रमावती नेमळेकर,असनिये येथील ह्रदयरोगाने ग्रस्त वैशाली सावंत, उच्चरक्तदाब आणि सांधेदुखीने त्रस्त केदार कोळपते आणि कानू कोलते, सावंतवाडी येथील सांधेदुखी आजाराने पिडीत राधिका मडकईकर अशा पाच गरजू रुग्णांना हे धनादेश प्रदान करण्यात आले. माजी नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले. यावेळी पुढील काळात आर्थिक परिस्थितीने ग्रासलेल्या आणि औषधोपचार न परवडणाऱ्या अनेकांना सामंत ट्रस्ट तर्फे मदत करण्यात येईल असे आश्वासन डॉ जयेंद्र परुळेकर यांनी दिले. यावेळी माजी नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर, मालवणी कवी दादा मडकईकर, विनायक कांडरकर आदी उपस्थित होते