एकेकाळचे कट्टर विरोधक सामंत बंधू - निलेश राणे एकाच व्यासपीठावर येणार

विशाल परब यांनी करून दाखवलं
Edited by: भरत केसरकर
Published on: October 12, 2022 16:06 PM
views 686  views

सिंधुदुर्ग | भरत केसरकर, पाॅलिटिकल ब्युरो : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय नव्या पर्वाला 15 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आणि शिंदे गटाचे मातब्बर मंत्री उदय सामंत आणि भाजपचे माजी खासदार तथा प्रदेश सचिव निलेश राणे एकाच व्यासपीठावर येणार आहे. त्यांमुळे या नविन दोस्ती पर्वाची सुरुवात महाराष्ट्राला तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये पाहायला मिळणार आहे. निमित्त आहे ते भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसाचे.


या वाढदिवसाच्या निमित्ताने उदय सामंत, निलेश राणे व किरण उर्फ भैय्या सामंत हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने महाराष्ट्रात नव्या मित्र मैत्रीचे पर्व यानिमित्ताने सुरू होणार आहे. त्यामुळे एकेकाळीचे कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर येणार असल्याने तळकोकणातील राजकीय समीकरणेच या निमित्ताने बदलून जाणार आहेत. ही समीकरण बदलल्यास रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपची ताकद वाढणार आहे. तर कुडाळ मालवण मधून भाजपचे निलेश राणेंची ताकद मजबूत होणार आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी सह पाचही विधानसभा मतदारसंघात भाजपची आणि शिंदे गटाची ताकद यामुळे दुप्पट होणार आहे. निलेश राणे आणि उदय सामंत,किरण सामंत यांच्या मैत्रीचे नविन पर्व या निमित्ताने सुरू होणार आहे. भाजपचे युवा नेते आणि युवा उद्योजक विशाल परब यांचा 15 ऑक्टोबरला वाढदिवस कुडाळ येथील एसटी डेपो मैदानावर मोठ्या उत्साह हजारोंच्या उपस्थित साजरा होत आहे. या कार्यक्रमाला निलेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत,सांगोल्याचे दबंग आमदार शहाजी बापू पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार यास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल परब यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असून सुमारे पाच ते दहा हजाराच्या वर लोक या वाढदिवसाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी भाजप सह शिंदे गट जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असून शिंदे गटाचे दबंग उद्योगमंत्री मंत्री उदय सामंत, माजी खासदार भाजपचे डॅशिंग नेतृत्व निलेश राणे, किरण उर्फ भैय्या सामंत हे काय बोलतात याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. हे दोन्ही नेते मोठी घोषणा करण्याची शक्यता असून या मैत्रीच्या नवीन पर्वा कडे साऱ्याच कोकणवासियासह  अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. तर शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांची तोफ धडाडणार असल्याने त्यांच्याही भाषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान निलेश राणे आणि उदय सामंत  एकाच व्यासपीठावर येत असल्याने मैत्रीचं नवं पर्व सुरू होत असल्याने भाजप सह शिंदे गोटातही आनंदाचा व उत्साहाचे वातावरण पसरले आहे. यावेळी उदय सामंत यांचे बंधू उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंतही उपस्थित राहणार असल्याने या तिघांची मैत्री भविष्यात कशी सुरू होणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिला आहे विशाल परब  यांनी ह्या तिघांना एकाच व्यासपीठावर आणण्याची आगळीवेगळी किमया करून दाखवल्याने भाजपच्या गोटात विशाल परब यांचे वजन वाढले आहे. विशाल परब हे माजी खासदार निलेश राणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. आपल्या शिष्यासाठी निलेश राणे या कार्यक्रमात नेमकी काय घोषणा करतात? आणि काय बोलतात? तर विशाल परब  यांना उदय सामंत व भैय्या सामंत कशा शुभेच्छा देतात? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे. तर राज्यभरातून मीडिया सुद्धा मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने हा कार्यक्रम भव्य दिव्य  होणार असल्याचे बोलले जात आहे.

विशाल परब यांनी दोघांना एकत्र आणण्याची किमया केल्याने विशाल परब यांचे भाजप दरबारी वजन वाढले आहे. यामुळेच निश्चितच निलेश राणे आपल्या शिष्या साठी १५ ऑक्टोबर विशाल परब यांच्यासाठी नेमकी काय घोषणा करतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.