चार वर्षांचा प्रश्न चार तासात मिटला ; खड्डा बुजला

सामाजिक बांधिलकीचं श्रेय
Edited by: विनायक गांवस
Published on: February 25, 2025 18:12 PM
views 81  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेचे बांधकाम अधिकारी मनोज राऊळ यांनी सामाजिक बांधिलकीच्या मागणीची दखल घेऊन लक्ष्मीनगर येथील रस्त्यावर पडलेला मोठ्ठा खड्डा काही तासातच बुजवला. चार वर्षाचा हा प्रश्न अवघ्या चार तासातच मिटल्यान नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यासाठी सामाजिक बांधिलकीच्यावतीने मनोज राऊळ यांचे मनःपूर्वक आभार सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे यांनी मानले आहे.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे , उपाध्यक्ष प्रा. शैलेश नाईक ,कार्याध्यक्ष संजय पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव, लक्ष्मण कदम, रूपा मुद्राळे, हेलन निबरे ,समीरा खलील व अन्य सहकारी सावंतवाडी शहरांमध्ये समाजसेवा करत आहे. अपघात मुक्त सावंतवाडी शहर बनवण्याचे मिशन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठाने  हाती घेतले आहे. त्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे. जे काम हाती घेतले ते पूर्ण केल्याशिवाय सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान चे कार्यकर्ते शांत बसत नाही. याच गोष्टीचे कौतुक होत आहे.

सावंतवाडी नगरपालिकेचे बांधकाम अधिकारी मनोज राऊळ यांनी सामाजिक बांधिलकीच्या मागणीची दखल घेऊन लक्ष्मीनगर येथील रस्त्यावर पडलेला मोठ्ठा खड्डा काही तासातच बुजवला. बरीच वर्षे प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लागला. या सेवाभावी उपक्रमासाठी पुढाकार घेणारे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, लक्ष्मण कदम, रुपा मुद्राळे अमित सावंत तसेच विशेष सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते महेश पांचाळ व कॉन्ट्रॅक्टर दादा नगनूर व सहकारी यांचे कौतुक होत आहे.