
सावंतवाडी : सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून शहरातील 60 धोकादायक गतिरोधकांवर पांढरे पट्टे व रस्त्यावरील ग्रिट साफ करून रस्ते पुर्ववत केले. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कडून झीरो अपघात मिशन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरात रात्री व पहाटेच्या सत्रात दुसऱ्या टप्प्यात शहरातील विविध ठिकाणी 60 धोकादायक गतिरोधकांना पांढरे पट्टे मारले. तसेच गांधी चौक भारतमाता हॉटेल समोर रस्त्यावरील धोकादायक ग्रिट साफ केली.
या उपक्रमाच जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर व युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी कौतुक केले. नगरपरिषदच काम सामाजिक बांधिलकी करत असून त्यांचा आदर्श घ्यावा असे मत श्री.मसुरकर यांनी व्यक्त केले.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे ,उपाध्यक्ष प्रा. शैलेश नाईक, लक्ष्मण कदम, रवी जाधव, समीरा खलील, सुजय सावंत, युवराज राऊळ, गौरव राजपूत यांनी हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाण्यासाठी परिश्रम घेतले. शहरातील जनतेकडून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. स्वच्छ शहर व सुंदर शहर बनवण्यासाठी हातभार लावणे तसेच समाज हिताचे उपक्रम सातत्याने राबवणे हेच एक सामाजिक बांधिलकीचे उद्दिष्ट असणार आहे असे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी सांगितले.