सामाजिक बांधिलकीचं कार्य कौतुकास्पद : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील

Edited by: विनायक गांवस
Published on: March 09, 2024 14:47 PM
views 37  views

सावंतवाडी : सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांचे  मदत कार्य कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी केल. सांगेली येथील  नवोदय विद्यालयाचा विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचे समजतात सामाजिक बांधिलकीच्या टीमनं हॉस्पिटलमध्ये पोहचून युद्धपातळीवर मदत कार्य सुरू केले. पालकांना धीर देत मुलांना रूग्णालयात दाखल करण्याकरिता मदत कार्य केले. तसेच सर्व मुलांना पेज- पाणी उपलब्ध करून दिले. पालक, डॉक्टर, सिस्टर व सर्व कर्मचाऱ्यांना रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. यासाठी सामाजिक बांधिलकीच्या समीरा खालील,रवी जाधव व अँड.बापू गव्हाणकर यांनी मदत केली. सकाळी पालक, विद्यार्थी डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी कॉफी व बिस्कीटची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे बाळू भटजी यांच्या मदत सहकार्याने दुपारी मुलांना, पालकांना डॉक्टर व सर्व कर्मचाऱ्यांना उपीट देण्यात आल. सामाजिक बांधिलकीचे  निस्वार्थ व प्रामाणिक कार्य पाहून उपस्थित डॉक्टर, पालक व  जिल्हा चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील भारावून गेले. त्यांनी सामाजिक  बांधिलकीच्या  कार्यकर्त्यांचे तोंड भरून कौतुक केले. या मदत कार्यासाठी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव,रुपा मुद्राळे, अध्यक्ष सतीश बागवे, उपाध्यक्ष शैलेश नाईक, सचिव समीरा खलील, दीपक सावंत,शिवम सावंत, सुजय सावंत, लक्ष्मण कदम, अशोक पेडणेकर, रमिजा दुर्वेश, रुपेश राठोड, बाशीर यांनी मदत कार्य केलं.