
सावंतवाडी : शहरामध्ये गेले कित्येक दिवस भटकत असलेला कर्नाटक येथील प्रशांत नामक ३७ वर्षे युवक मतिमंद असल्यामुळे शहरात भटकत होता. त्याच्या उजव्या पायाला मोठी जखम होऊन गॅंग्रीन झाल आहे. त्यामुळे त्याला वेदना होत होत्या. सकाळपासून तो तलावाच्या काठी उन्हात पडून होता. हे पाहून सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी त्याची दखल घेतली.
त्यांनी त्याला आंघोळ घालून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. सावंतवाडी शहरातील सलून चालवणारे यूपी येथील युवक शैलेश ठाकूर यांनी सामाजिक भान राखून त्याची केस दाढी केली. तसेच होमगार्ड राजन सांगेलकर व पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सामाजिक बांधिलकीला मोलाचे सहकार्य केले. उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून आता त्याला 108 ने अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आले.
हा बेवारस रूग्ण बराझाल्यानंतर योग्यरीता प्रोसिजर करून त्याला संविता आश्रममध्ये पाठवण्याची जबाबदारी सामाजिक बांधिलकीनी घेतली आहे. याप्रसंगी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर, डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.