
सावंतवाडी : मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच प्रशासकीय कारभारावर लक्ष नसून त्यांच्या दुर्लक्षामुळे शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. धुळीच्या साम्राज्यात शहर असताना पालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे मुख्याधिकारी यांची बदली करावी अशी मागणी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे करणार असल्याची माहिती भाजपचे माजी शहराध्यक्ष, अँड. संजू शिरोडकर यांनी दिली आहे.
अॅड. शिरोडकर यांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार लक्ष वेधूनही नागरिकांची हेळसांड होत आहे. प्रशासकीय राजवट असल्याने हम करे सो कायदा चाललं आहे. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घातलं जातं आहे.त्यामुळे अशा मुख्याधिकारी यांची बदली पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.