तालुकास्तरीय समूह नृत्य स्पर्धेत साळशी हायस्कूलचं सुयश...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 10, 2024 13:06 PM
views 122  views

देवगड : देवगड तालुक्यातील शिरगांव महाविद्यालय आयोजित तालुकास्तरीय समूह नृत्य स्पर्धेत साळशी हायस्कूलने सुयश प्राप्त करत द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

या देशभक्तीपर समूह नृत्याने सर्व उपस्थितांची वाहवा मिळवत पूर्ण वातावरण देशभक्तीपर बनवले.या नृत्यामध्ये प्रशालेच्या तनिषा, जान्हवी व दिव्या गांवकर, केतकी साळसकर, हिमानी घाडी, देविका सातोसे, श्वेता परब या इ. ८ व ९ वी च्या विद्यार्थ्यीनीनी सहभाग घेतला.यांना पुरुषोत्तम साटम सरांनी सुंदर नृत्य मार्गदर्शन केले. या दमदार कामगिरी बद्दल मुख्याध्यापक माणिक वंजारे , सत्यवान सावंत – चेअरमन – स्कूल कमिटी, सर्व संस्था पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ, शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.