
कुडाळ : साळगाव ग्रामपंचायतीवर भाजप प्रणित श्री देवी माऊली औद्योगिक विकास पॅनलची एकहाती सत्ता येईल. सरपंचासह अकरा सदस्यही भाजपचे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. आम्ही केलेल्या विकासाच्या जोरावर साळगावची जनता पुन्हा एकदा सत्ता आमच्या हातात देतील, असाही दावा उमेश शिवराम धुरी यांनी केला आहे. सौ.अनघा अमित दळवी यांना निवडून आणणारच अशी भीष्म प्रतिज्ञा सरपंच उमेश धुरी यांनी केली आहे.