सलाम कोटकामते...त्या सन्मानाने झाले अश्रू अनावर !

श्रीदेवी भगवती संस्थानच्यावतीने शहीद परिवार सन्मान व गौरव सोहळ्याचं शानदार आयोजन
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 02, 2022 17:35 PM
views 915  views

देवगड : 15 ऑगस्ट 1947 साली इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाची सुटका होत देश स्वतंत्र झाला आज देशाची 75 वर्षाची वाटचाल पूर्ण होऊन शतकोत्तर घोडदौड वेगाने सुरू आहे देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मोठया दिमाखात सर्वत्र साजरा करण्यात आला. पण देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या शहिदांचा हुतात्मांचा यथोचित सन्मान होताना दिसलेला नाही फॉम्युलिटी म्हणून सन्मान सर्वच करतात पण या सन्मानाचे मोलचं वेगळे आहे. नुसतं जय हिंद,भारत माता की जय, म्हटलं तरी देखील त्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या हुतात्म्यांच्या आठवणीने कंठ दाटून ये ये आपसुक अश्रू अनावर होतात असाच काहीशा क्षण हा आज कोण भगवती मंदिरात पाहायला मिळाला . निमित्त होतं श्रीदेवी भगवती संस्थान कोटकामतेच्या वतीने स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या शहीद परिवार सन्मान व गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे.

      देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण झाली पण आजही देशासाठी इंग्रजांची गुलामगिरी सहन करत ज्या यातना भोगल्या हसतमुख पणे देशासाठी प्राणाची आहुती दिली. त्यावेळच्या शहीद हुतात्माचा तो क्षण आठवला तरी  काळजाचा थरकाप उडतो.मग त्या शहीद हुतात्मा परिवारातील सदस्यांवर काय दुःखाचा डोंगर कोसळला असेल याची कल्पना करणेही कठीण आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानंतरही शहीद हुतात्म्यांच्या कुटुंबीयांचा योग्य तो सन्मान होताना दिसत नाही. म्हणूनच संस्थानकालीन नवरात्रोत्सवाची परंपरा लाभलेल्या  इनामदार श्री देवी भगवती संस्थान च्या वतीने हा अनोखा सन्मान सोहळा प्रथमच आयोजित करण्यात आला.

        सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी मंडळी स्वातंत्र्यलढयात शहीद झाली त्या सर्व कुटुंबीयांचा शोध घेत  या संस्थांनने त्यांचा यथोचित सन्मान कोटकामते श्री देवी भगवती मंदिर येथे केला.आजच्या घडीला सत्कार पुरस्काराच्या गर्दीत हरवलेल्या राजकीय मंडळींना देशाच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती  दिली त्या शहीद हुतात्म्या कुटुंबातील सन्मान सोहळा पाहून  गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकीय मंडळींच्या माना मात्र शरमेने खाली गेल्या असतील. असा अविस्मरणीय क्षण या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने आज इथे पाहायला मिळाला. हा सन्मान शहिदांच्या नावाने स्वीकारताना त्यांचे परिवारातील सदस्य पत्नी, माता पिता, भगिनी यांच्या डोळ्यातून येणारे अश्रू बरेच काही सांगून गेले.  म्हणूनच या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वच मंडळींनी इनामदार श्री देवी भगवती संस्थानच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल गौरवोद्गार काढताना सलाम कोटकामते..... या सम्मांनाने अश्रू झाले अनावर !!