'एसपीके'च्या साईश कांबळीची राष्ट्रीय स्तरावर निवड

मान्यवरांनी केला सत्कार
Edited by: रुपेश पाटील
Published on: November 28, 2022 19:20 PM
views 499  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संखा, पुणे गांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय कला उत्सवामध्ये 'खेळणी तयार करणे' या कला प्रकारामध्ये सावंतवाडी शहरातील श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील इयत्ता अकरावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी साईश संदीप कांबळी याने राज्यतरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकक पटकावला आहे. त्याची भुवनेश्वर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी स्तुत्य निवड झाली आहे.

साईशच्या घवघवीत यशाबद्दल संस्थेच्या चेअरमन सौ. श्रीमंत शुभदादेवी भोंसले (राणीसाहेब), संस्थेचे सदस्य जयप्रकाश सावंत, महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, कनिष्ठ महाविदयालयाचे समन्वयक प्रा. व्ही. पी. राठोड. मार्गदर्शक प्रा. अमोल कांबळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.