दोडामार्ग : तालुक्यातील कळणे पोलीस आउट पोस्ट स्टेशनची इमारत जमीन दोस्त झाली आहे. या आउट पोस्टच्या हद्दीत 18 गाव असून याठीकाणी एकही पोलीस आउट पोस्ट मध्ये नसतात या ठिकाणी नवीन इमारत व 24 तास पोलीस या मागणी साठी बांदा येथील साईप्रसाद कल्याणकर यांनी कळणे आउट पोस्ट येथे उपोषण सुरु केले आहे. यावेळी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी कायम स्वरूपी पोलीस ठेवण्याचे लेखी आश्वासन दिल्या नंतर कल्याणकर यांनी आपले उपोषण मागे घेतले.
दोडामार्ग तालुक्यातील 18 गावांचे पोलीस आउट पोस्ट असलेली इमारत दोन वर्षा पूर्वी एका बाजूने कोसळली ही इमारत आता पूर्णपणे धोकादायक बनली असून या ठिकाणी एकही पोलीस उपस्तित नसतात त्यामुळे या हद्दीत असलेल्या गावांनी आपल्या समस्या सोडविण्यासाठी जायचे कुठे? असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता. वारंवार कळणे ग्रामस्त यांनी दोडामार्ग पोलीस स्टेशन ला कळवून सुद्धा याकडे दुर्लक्ष केले जात होते. पोलिसांना विचारणा केली असता या संदर्भात आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार केलेला आहे असे सांगण्यात यायचे.
या मोडकळीस आलेल्या इमारत नव्याने बांधकाम करावे व सद्य स्थितीत तंबू घालून 24 तास या ठिकाणी पोलीस ठेवण्यात यावे या मागणी साठी आज महात्मा गांधी जयंती निमित्त साईप्रसाद कल्याणकर यांनी कळणे पोलीस आउट पोस्ट येथे सकाळी 11 वाजता उपोषणास सुरवात केली आहे. यावेळी दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी व त्यांची टीम यांनी भेट दिली व याठीकाणी इमारत नवीन बांधण्या संदर्भात आपण तसा प्रस्ताव पाठवू व 24 तास या ठिकाणी पोलीस ठेवण्या संदर्भात कार्यवाही करू असे लेखी पत्र दिल्या नंतर कल्याणकर यांनी आपले उपोषण मागे घेण्यात आले.