सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचं स्कॉलरशिपमध्ये यश !

Edited by: विनायक गांवस
Published on: July 03, 2024 08:07 AM
views 127  views

सावंतवाडी : राज्य परिक्षा परिषदेच्यावतीने आयोजित केलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या विद्यार्थांनी शिष्यवृत्ती मिळवून यश प्राप्त केले. रविवार १८ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता आठवीच्या कॅडेट ऋग्वेद राजन पाताडे व कॅडेट पार्थ निलेश सांडव या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येत शिष्यवृत्तीस पात्र ठरले. 

सैनिक स्कूलमध्ये एन.डीन.ए. परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षा,डाॅ.होमी भाभा परिक्षा,ऑलिंपियाड परिक्षा देतात. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांसाठी  विशेष मार्गदर्शन केले जाते.शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अध्यक्ष सुनील राऊळ, संचालक जाॅय डांटस, कार्यालयीन सचिव दिपक राऊळ, सर्व संचालक,प्राचार्य एन.डी.गावडे यांनी अभिनंदन केले आहे.