
देवगड : बोटिवरून तोल जावून समुद्रात पडल्या मुळे देवगड बंदरातील नौका म्हाळसा मल्हार या नौकेवरील खलाशी विशाल विष्णू गुरव(३१) रा.पाटगाव वरची गुरववाडी याचा पाण्यात बुडून मृत्यु झाला.या खलाशाचा मृतदेह रविवारी पहाटे ५.३० वा.सुमारास देवगड खाडीत सापडला.
पोलीसांनी दीलेल्या माहीतीनूसार, देवगड कील्ला येथील अक्षय संजय हरम यांच्या म्हाळसा मल्हार या नौकेवरील खलाशी विशाल विष्णू गुरव(३१) रा.पाटगाव वरची गुरववाडी हा खलाशी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वा.सुमारास नौका देवगड बंदरात उभी असताना नौकेवरून तोल जावून पाण्यात पडला. मात्र शोधाशोध करून तो सापडला नाही. दुसऱ्या दिवशी १ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.३० वा.सुमारास त्याचा मृतदेह देवगड खाडीत सापडला. त्याला दारूचे व्यसन होते.याबाबतची खबर अक्षय हरम यांनी देवगड पोलीस ठाण्यातदिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून तपास पो.हे.कॉ.राजन जाधव करीत आहेत.