देवगड खाडीमध्ये पडून खलाशी मृत्युमुखी !

Edited by:
Published on: March 02, 2024 14:06 PM
views 194  views

देवगड : देवगड बंदरात मासेमारी नौकेवर कामाला असलेला युवक दीपक कृष्णा मुळ्ये रा हुंबरट ता.कणकवली हे देवगड येथील खाडीच्या पाण्यात तोल जाऊन पडून मृत्युमुखी पडला आहे. ही  घटना २९ फेब्रुवारी सायं.७ च्या सुमारास घडली. याविषयी देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूचू नोंद करण्यात आली आहे. या घटनेची फिर्याद ज्योती प्रकाश पवार यांनी देवगड पोलिस स्थानकात दाखल केली आहे .

दीपक मुळ्ये हे दाऊद सोलकर यांच्या अलनाहीद- १ एक या नौकेवर नोकरी करीत होते .२९ फेब्रु ला सायंकाळी ७ च्या सुमारास ते नापत्ता झाले त्यांच्या मृतदेह १ मार्च सकाळी आढळून आला. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन जाधव करीत आहेत.