एडगाव-वायंबोशी उपसरपंचपदी सायली घाडी बिनविरोध

सौ.घाडी यांचं प्रमोद रावराणे यांनी केले अभिनंदन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 15, 2023 14:03 PM
views 148  views

एडगाव वायंबोशी उपसरपंच पदी सायली घाडी बिनविरोध 

वैभववाडी: एडगाव-वायंबोशी गृप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सायली घाडी यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपसरपंच रविंद्र रावराणे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदाकरीता आज  निवडणूक झाली.

  सर्व सदस्यांना पदाची संधी मिळावी याकरिता उपसरपंच रविंद्र रावराणे यांनी राजीनामा दिला होता.त्यानंतर या पदाकरीता निवडणूक लागली होती. आज निवडणूक निर्णय अधिकारी उमेश राठोड यांच्या उपस्थितीत निवडणूक झाली.उपसरपंच पदाकरीता सायली घाडी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता.त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ही निवड बिनविरोध जाहीर केली.निवडीनंतर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी नुतन उपसरपंचांचे अभिनंदन केले.यावेळी सरपंच रविना तांबे ,रवळनाथ विकास सोसायटी चेअरमन , सुनिल रावराणे , भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष  राजु पवार , विनोद रावराणे , रविंद्र रावराणे, दत्ताराम पाष्टे,प्रज्ञा रावराणे,वैष्णवी रावराणे, चेतना पवार ,रविंद्र तांबे ,गोविंद घाडी, सुनिल घाडी , बयाजी गुरखे , सखाराम फाळके, योगेश पवार व ग्रामस्थ उपस्थित होते .