सह्याद्री फाउंडेशनचा मान्सून महोत्सव 27 जुलै ते 19 ऑगस्ट कालावधीत

Edited by: विनायक गांवस
Published on: July 21, 2024 14:24 PM
views 171  views

सावंतवाडी : सह्याद्री फाउंडेशन चा सन 2024 मान्सून महोत्सव 27 जुलै ते 19 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या मान्सून महोत्सवात दरवर्षीप्रमाणे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. वक्तृत्व, सुदृढ बालक व भक्तीगीत गायन स्पर्धा तसेच  रानभाज्या स्पर्धांच आयोजन करण्यात आलं आहे. गरजू विद्यार्थ्यांना मदत व शैक्षणिक साहित्य वाटप, होतकरू दशावतार नाट्य मंडळांना आर्थिक मदत अशा विविध उपक्रमाने यंदा मान्सून महोत्सव घेण्यात येणार आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष सुनिल राऊळ व माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली.

सैनिक पतसंस्थेच्या शहर कार्यालयात श्री. राऊळ यांच्या उपस्थित बैठक झाली. यावेळी अध्यक्ष रवींद्र मडगावकर माजी अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब विजय चव्हाण सचिव प्रताप परब अँड. संतोष सावंत प्रल्हाद तावडे माजी सभापती प्रमोद सावंत विभावरी सुकी हर्षवर्धन धारणकर सुहास सावंत. संजय मडगावकर आदी उपस्थित होते. या बैठकीत यंदाचा मान्सून महोत्सवाचा शुभारंभ 27 जूनला सह्याद्री पट्ट्यात वकृत्व स्पर्धा व शैक्षणिक साहित्य वाटप गुणवंत विद्यार्थी गौरव या कार्यक्रमाने कलंबिस्त पंचक्रोशीत घेण्यात येणार आहे. 19 ऑगस्टला सावंतवाडी नगरपालिकेच्या सभागृहात सकाळी 11 वाजता स्पर्धांचे बक्षीस वितरण कार्यक्रमाने समारोप केला जाणार आहे. शैक्षणिक साहित्य वाटप 27 जुलै पासून ते तीन ऑगस्ट पर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. तर 4 ऑगस्ट ला सावंतवाडी आदिनारायण मंगल कार्यालय येथे सकाळी 11 वाजता सुदृढ बालक स्पर्धा तर 11 ऑगस्टला सायंकाळी चार वाजता रान भाजी स्पर्धा आदिनारायण मंगल कार्यालय येथे होणार आहे. 18 ऑगस्टला भक्तिगीत गायन स्पर्धा सायंकाळी चार ते आठ विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथे तर 27 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता कलंबिस्त हायस्कूल येथे सह्याद्री पट्ट्यातील शालेय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. 19 ऑगस्टला महोत्सवाचा समारोप केला जाणार आहे. यावेळी  दशावतार कंपनील आर्थिक मदत केली जाणार आहे. वकृत्व स्पर्धा 27 जुलैला होणार आहे. याबाबत ची नावे कलंबिस्त हायस्कूल मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांच्याकडे नोंदवावी, या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.