
कुडाळ : सर्वोदय पतसंस्थेचा कारभार स्वच्छ आहे. विरोधकांनी नाहक माझ्याबरोबर माझ्या संचालकांवर आरोप करून या निवडणुकीत पतसंस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र आपण गेली 25 वर्षापेक्षा जास्त सहकारात प्रामाणिकपणे काम करत आलो आहे. सहकार्यात अनेक पदे उपभोगली आहेत. त्यामुळे कै.शिवराम भाऊ जाधव यांनी सहकारातील रूजवलेले हे रोपटे मोठे करण्याची जबाबदारी आपणा सर्वाचीच आहे.
सर्वोदय पतसंस्थेचे सभासद आपल्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकून मोठ्या मताधिक्यांनी विजय करतील आणि कामाची पोच पावती आपल्याला देतील असा दावा विद्यमान चेअरमन प्रकाश मोर्ये यांनी केला आहे. आपण सहकारात प्रामाणिकपणे काम केले. सर्वोदय पद्धत संस्थेच्या विकासासाठी जोमाने प्रयत्न केला या आपल्या कामामुळेच व सहकारी यांच्या प्रयत्नाने सर्वोदय पदसंस्थेतील ठेवीदारानी मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या. आपल्या पॅनल्स विजय हा निश्चित आहे. आपण केलेल्या कामाची पावती म्हणून सहकार महर्षी जाधव साहेब सहकार पॅनलच्या बाराच्या बारा उमेदवारांच्या नारळ निशाणी वर शिक्का मारून विजयी करा. असे आवाहन प्रकाश मोर्ये यांनी केले आहे.