
सावंतवाडी : वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदिरात 21 दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू असून बुधवार 10 सप्टेंबर 2025ला गणेशोत्सवातील संकष्टी चतुर्थी निमित्ताने दिवसभर धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. या दिवशी सकाळी 6.30 वाजता श्रींची महापूजा, त्यानंतर सामुदायिक अथर्वशिर्ष पठन, दुपारी महाआरती, श्रीना सहस्त्र मोदक नैवेद्य अर्पण व रात्री भाजनादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
वैश्यवाड्यातील गणपतीकडील सामुदायिक अथर्वशीर्ष पठण व सहस्र मोदक नैवेद्य अर्पण सोहळ्याचे यावर्षीचे हे 21 वे वर्ष आहे. यावेळी शेकडो भाविक नैवेद्याचे तसेच नवस पूर्तीचे मोदक श्रींना अर्पण करतात. या धार्मिक कार्यक्रमांना सर्व भाविकांनी सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, महाआरती, सहस्त्र मोदक अर्पण व भाजनादी कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन वैश्यवाडा हनुमान मंदिर उत्सव कमिटी तर्फे करण्यात आले आहे.