सावंतवाडी विधानसभा मतदार संघात भगवाच फडकणार : शैलेश परब

परब यांचा मतदार संघात झंझावती दौरा, कार्यकर्त्यात उत्साह
Edited by: संदीप देसाई
Published on: July 11, 2023 16:53 PM
views 254  views

दोडामार्ग : स्वतः च्या स्वार्थासाठी कोणी कुठेही गेले असले तरी शिवसेना आजही तेवढ्याच ताकदीने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांत उभी आहे,  त्यामूळे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचे कार्यकर्ते भगवा फडकविण्यात सज्ज असून आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा  असल्याचा विश्वास सावंतवाडी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना दिला.

  सावंतवाडी विधानसभा मतदार संघात मंगळवारी शैलेश परब यांनी दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला या तिन्ही तालुक्यात कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा व छत्री वाटप कार्यक्रम घेतला. त्यावेळी आयोजित दोडामार्ग येथील कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात छत्र्याचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा प्रमुख संजय पडते,  युवा नेते गितेश राऊत, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, तालुका प्रमुख संजय गवस, उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, यूवा तालुका समन्वयक मदन राणे, श्रेयाली गवस, विनिता घाडी, संपदा देसाई, संदेश वरक संतोष मोरये, लक्ष्मण  आयनोडकर, विजय जाधव, संदेश राणे, मिलिंद नाईक, दशरथ मोरजकर आदी उपस्थित होते. विधानसभा मतदार संघात कम बॅग करत शैलेश परब यांनी दमदार एंट्री केल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत पुन्हा एकदा नवचैतन्य संचारलं आहे.