सावंतवाडी नगर परिषदेतर्फे 'सफाई मित्र सुरक्षा शिबिर'

Edited by: विनायक गावस
Published on: September 26, 2023 12:37 PM
views 82  views

सावंतावडी : स्वच्छ भारत अभियान २ अंतर्गत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा अंतर्गत सावंतवाडी नगर परिषदेतर्फे स्वच्छता ही सेवा व स्वच्छता पंधरवडा 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये सफाई मित्र सुरक्षा शिबिर याचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये सफाई मित्रांची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात येत आहे.

उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी यांच्यामार्फत ही तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये सीबीसी एचआयव्ही ईसीजी तसेच जॉईंट पेन असल्यास त्यावर ट्रीटमेंट तसेच आवश्यकतेनुसार इतर तपासण्या करण्यात येणार आहेत. याकरिता वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर ऐवाळे यांचे मार्गदर्शनाखाली डॉक्टर सागर जाधव व डॉक्टर चिन्मय पिशवीकर, डॉ  अमरापूरकर हे वैद्यकीय तपासणी करीत आहेत.

या शिबिराचे आयोजन 26 सप्टेंबर व 27 सप्टेंबर 2023 या दोन दिवसात करण्यात आले आहे. याकरिता प्रशासक प्रशांत पानवेकर व मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम आयोजित केले आहे.  मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी वैद्यकीय तपासणी बाबत उपजिल्हा रुग्णालय यांचे आभार मानले आहेत. यावेळी आरोग्य विभागाने वैभव नाटेकर, रसिका नाडकर्णी आदी उपस्थित होते.