गावागावात गाठीभेटी घेऊन जनतेचे प्रश्न जाणून घ्या : सचिन वालावलकर

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची आढावा बैठक संपन्न
Edited by: दिपेश परब
Published on: June 12, 2024 14:21 PM
views 201  views

वेंगुर्ले : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार नारायण राणे यांच्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सुचनेप्रमाणे सर्व शिवसैनिकांनी जोमाने काम केले. या विजयात दीपक केसरकर यांचा मोलाचा वाटा आहे. मंत्री केसरकर यांनी सातत्याने मच्छिमार, शेतकरी, गरजू विद्यार्थी, नुकसानग्रस्त नागरीक यांना मदत केली आहे. यामुळे पुढील काळात तालुक्यात सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन गावागावात गाठीभेटी घेतल्या पाहिजेत. आपल्याला जनतेसाठी,  गोरगरीब लोकांसाठी काम करायचे आहे. यामुळे विभाग निहाय बैठका घ्या, गावागत जे काही नागरिकांचे प्रश्न असतील ते जाणून घ्या अशा सूचना शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी वेंगुर्ले येथील पदाधिकारी आढावा बैठकीत केले. 

सप्तसागर येथील शिवसेना कार्यालयात बुधवारी (१२ जून) संपन्न झालेल्या वेंगुर्ले तालुका शिवसेना पदाधिकारी आढावा बैठकित सचिन वालावलकर बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे, जेष्ठ पदाधिकारी महेश सामंत, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, सचिन देसाई, तालुका संघटक बाळा दळवी, कोचरा सरपंच योगेश तेली, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश गावडे, शहरप्रमुख संतोष परब आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

यावेळी पुढे बोलताना सचिन वालावलकर म्हणाले, या विधानसभा मतदार संघात शिवसेनेची ताकद वाढवण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. यामुळे सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी कामाला लागावे असे आवाहन केले. 

सर्व शिवसैनिकांचे आभार : नितीन मांजरेकर 

यावेकी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकतीने काम केलेल्या सर्व शिवसेना पदाधिकारी,  शिवसैनिक तसेच महायुतीतील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. तर पावसामुळे शेतकऱ्यांचे तसेच नागरिकांच्या नुकसानीच्या घटना घडल्यास तात्काळ त्यांच्यापर्यंत पोचून त्याची माहिती कार्यालयापर्यंत पोचवण्याचे आवाहन करत आगामी पदवीधर निवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभाग निहाय संघटनात्मक बैठका घेण्याच्या सूचना केल्या.