सोनाळी गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी सचिन तळेकर

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 06, 2024 13:47 PM
views 200  views

वैभववाडी : सोनाळी गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सचिन तळेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली. सोनाळी गावची ग्रामसभा सरपंच भीमराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत गावची तंटामुक्ती समिती नव्याने गठीत करण्यात आली.श्री.तळेकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी माजी सभापती अरविंद रावराणे, पोलीस पाटील राजेंद्र रावराणे, माजी सरपंच समाधान जाधव, मावळते अध्यक्ष मारुती पाटील, बाळा बोभाटे, सुवर्णा तळेकर,प्रकाश पालकर, भास्कर पाटील, रमेश गुरव, ग्रामसेवक विकास बेळेकर, आदी उपस्थित होते.  यावेळी मावळते अध्यक्ष पाटील यांनी वर्षभर चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांचा ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच भोसले यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. तर श्री. तळेकर यांचा मावळते अध्यक्ष श्री.पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.