
कुडाळ : कुडाळ तहसीलदारपदाचा पदभार सचिन पाटील यांनी स्वीकारला असून ते महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मंत्रालयातील कार्यालयात कार्यरत होते त्यांची बदली कुडाळ येथे झाली.
कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांची बदली रत्नागिरी येथे झाल्यानंतर कुडाळ तहसीलदार पद रिक्त झाले होते. या जागेवर राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मंत्रालयातील कार्यालयात कार्यरत असणारे सचिन पाटील यांना कुडाळ तहसीलदार पदाचा पदभार देण्यात आला आहे. त्यांनी हा पदभार आज (सोमवारी) स्वीकारला. यापूर्वी त्यांनी चंद्रपूर, गोंदिया या ठिकाणी काम केले आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे अनेक संघटनांकडून स्वागत करण्यात आले.
पदभार स्वीकारल्यानंतर सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या योजना कशा राबविल्या जातील आणि त्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचला जाईल यासाठी प्रयत्न केले जातील असे तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले.










