इंधना अभावी ग्रामिण रुग्णालयाची सेवा ठप्प

रुग्णालय व्यवस्थापनाशी जागरुक नागरिकांची चर्चा
Edited by:
Published on: April 27, 2025 19:22 PM
views 27  views

मंडणगड : इंधना अभावी ग्रामिण रुग्णालयाची रुग्णवाहीका सेवा वळोवेळी ठप्प होत असल्याने या संदर्भात नगरसेवक आदेश मर्चंडे यांनी रुग्णालय व्यवस्थापनास २५ एप्रिलला चांगलेच धारेवर धरले. दरम्यान ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बालाजी सगरे यांच्याशी जागरुक नागरीकांनी रुग्णालयातील विविध समस्या संदर्भात दीर्घकाल चर्चा केली व नागरीकांच्या समस्या मांडल्या. यावेळी  रिपाइं आठवले गटाचे जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य विनोद जाधव, डॉ. प्रभाकर भावठाणकर, विजय खैरे उपस्थित होते. 108 या अत्यावश्यक रुग्णवाहीकेच्या सेवेसंदर्भात यावेळी प्रामुख्याने प्रश्न उपस्थित करण्यात आले.

या सेवेकरिता शासन पुरेसा निधी उपलब्ध करुन देत असतानाही अत्यव्यस्थ स्थितीतील महिला, जखमी आपद्ग्रस्त व रुग्णांना रुग्णालयात येण्यासाठी गाडी अभावी चार तास प्रतिक्षा का करावी लागते असा संतप्त सवाल नागरीकांनी यावेळी उपस्थित केला. नकुतेच इंधन नसल्याने एका रुग्णास जखीम असतानाही गाडीसाठी चार तासांची प्रतिक्षा करावी लागलेला असल्याचा गंभीर प्रकार यावेळी चर्चीला गेला. या रुग्णवाहीकेवर कार्यरत डॉक्टर व चालकाशी ही प्रत्यक्ष चर्चा करण्यात आली. यावेळी रुग्णालयातील विविध समस्यांसदर्भात चर्चा करण्यात आली व यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचा आश्वासन देण्यात आले. रुग्णलायाची रुग्णवाहीका व जनरेटरसाठी वेळेवर उपलब्ध होत नसलेलल्या डिझेलची व्यवस्था कऱण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्याचे ठरले. रुग्णालयात महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या सोनोग्राफी सेंटरसाठी टेक्नीशियन नियुक्त करण्यात यावा यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले.

रुग्णालयात कायम स्वरुपी एम.बी.बी.एस.डॉक्टर नियूक्त कऱण्याची मागणीही यावेळी कऱण्यात आली. याशिवाय तालुक्यात चार तज्ञ अनुभवी वैद्यकीय अधिकारी हवेत, 108 रुग्णवाहिकेची देव्हारे आरोग्य केंद्रांत सुविधा उपलब्ध करावी, तालुक्यातल 108 रुग्णवाहिकेवर एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने अजून एका वैद्यकीय अधिकाऱ्यांची