
सावंतवाडी : पंधरा वर्ष आमदार, आठ वर्षे मंत्रीपद भोगून जो माणूस सावंतवाडीचा विकास करू शकत नाही, तो माणूस चार दिवसात काय विकास करणार ? असा सवाल उबाठा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केला. साडेचार वर्ष कोमात असलेले केसरकर आता निवडणुकीच्या तोंडावर जोमात आल्याची टीका रुपेश राऊळ यांनी केली.
दरम्यान, राजन तेली यांनी सिंधू रत्न मध्ये ट्रान्सफॉर्मर देण्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्या आरोपात तथ्य असून राजन तेली यांनी अर्धवट माहिती देण्यापेक्षा त्यांनी वेंगुर्ल्यातील त्या शुक्राचार्यचे नाव जाहीर करावे असे आव्हान श्री.राऊळ यांनी दिले. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार अमोल कोल्हे यांनी केसरकारांना सावंतवाडी मतदारसंघातून त्यांना जोरदार चपराक दिली आहे. निवडणूक आली की मोठंमोठ्या घोषणा भूमिपूजन करायची. मात्र निवडणुका झाल्या की मात्र ते प्रकल्प ही नाही आणि केसरकरही नाही. यामुळे आता लोकांची किती दिशाभूल करणार ? लोकांनीही हे आता ओळखलेल आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता यांना जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही असं मत व्यक्त केले.
तर राजन तेली यांनी सिंधूरत्न मध्ये झालेल्या भ्रष्टाचारा आरोपांमध्ये पूर्ण सत्य असून त्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे या संदर्भात आम्ही उद्या कलेक्टरांची भेट देऊन संबंधितांची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत. परंतु राजन तेली यांनी अर्धवट माहिती न देता त्या भ्रष्टाचाराच्या शुक्रचाऱ्याचं नाव देखील जाहीर करावे असे आव्हान यावेळी दिले. याप्रसंगी मायकल डिसोझा, चंद्रकांत कासार आदी उपस्थित होते.