तळवडे पर्यटन महोत्सवात आ.नाईकांच्या हस्ते रूपेश राऊळांचा सन्मान

Edited by: विनायक गांवस
Published on: May 02, 2023 18:30 PM
views 105  views

सावंतवाडी : छोट्याशा तळवडे गावात १७ वर्षांपूर्वी प्रकाश परब यांनी पर्यटन महोत्सव आयोजित करण्याचे ठरविले. सावंतवाडी व मालवण नगरपालिकेनंतर एखाद्या ग्रामपंचायत क्षेत्रात पर्यटन महोत्सव आयोजित करणारा तळवडे हा एकमेव गाव आहे. हि परंपरा स्वर्गीय प्रकाश परब यांच्या निधनानंतरही सुरु ठेवली त्याबद्दल आनंद असून प्रकाश परब मित्रमंडळाचे कौतुक वाटते. प्रकाश परब ध्येयनिष्ठ व्यक्ती होते. दिवसरात्र लोकांच्या सेवेसाठी झडत होते. ते आज असते तर येथील राजकारणाची स्थिती वेगळी असती. तळवडे गाव सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर आहेच त्याचबरोबर येथील उद्योजक नागरिकांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपली छाप उमटविली आहे. तळवडे गावात उद्योजक घडण्याची परंपरा पुढील पिढीने सुरु ठेवावी.असे प्रतिपादन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केले.


             प्रकाश परब मित्रमंडळ सर्व सेवाभावी संस्था व तळवडे ग्रामस्थ यांच्या वतीने तळवडे येथे पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवाचे उदघाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते व शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा सत्कार आ.वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच आमदार वैभव नाईक,सतीश सावंत व इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विवीध सांस्कृतिक कार्यक्रम,पारंपारिक लोककला कार्यक्रम यावेळी पार पडले. याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थिती दर्शविली.


           सतीश सावंत म्हणाले, प्रकाश परब यांनी कधीही राजकीय मतभेदातून काम केले नाही. जिल्हा बँकेत काम करते वेळी शेतकऱ्यांच्या हिताच्या ज्या गोष्टी करता येतील त्या करण्याचे काम त्यांनी केले. जिल्हा परिषदच्या मध्यमातून त्यांनी तळवडे गावात वेगवेगळ्या योजना राबविल्या. या जिल्ह्याचा विकास व्हावा तसेच पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. पर्यटनातून तळवडे गावाचा विकास होण्यासाठी त्यांनी दूरदृष्टीने ठेवून पर्यटन महोत्सव आयोजित केला. त्यांचे कार्य कौतुकास्पद होते. 


          यावेळी सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, बाळू कांडरकर, कुडाळ उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, तळवडे सरपंच वनिता मेस्त्री, निरवडे सरपंच सौ. गावडे, उपसरपंच गौरव मेस्त्री, बंड्या परब, अनिल जाधव, सोसायटी चेअरमन आप्पा परब व इतर संचालक,त्याचबरोबर विनोद काजरेकर, आनंद बुगडे, सुरेश गावडे, विलास परब, रवींद्र परब, बाबा परब, रवी काजरेकर, स्नेहल राऊळ, शामसुंदर मालवणकर, सदा गावडे, प्राजक्ता गावडे, विलास नाईक, बाबा मालवणकर, काका सावंत, गणेश परब, पर्यवेक्षक खानोलकर, दत्तप्रसाद परब, गजानन परब, जालिंदर परब, महेश परब, रोहित परब, योगेश सावंत, नमिता सावंत, नमिता परब, विनोद वराडकर, राजन रेडकर, अशोक दळवी, तात्या परब, संतोष राऊळ, अप्पा नागवेकर, बाळकृष्ण सामंत, साईनाथ परब, गिरीश शिरोडकर, सूरज डिचोलकर, केशव तुळसकर, रघु गावडे, राजन जाधव आदींसह प्रकाश परब प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.