पालकमंत्र्यांच्या विधानात आतला गेम : रूपेश राऊळ

Edited by: विनायक गांवस
Published on: November 25, 2025 17:42 PM
views 13  views

सावंतवाडी : निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. आज भाजपची प्रचारसभा झाली. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे उपस्थित होते. सत्ताधारी पक्षाला सर्वप्रथम प्रचारसभा घ्यावी लागते यावरून त्यांना पराभव दिसू लागला असं म्हणाव लागेल. राज्यात मुख्यमंत्री असताना सावंतवाडीत यावं लागलं. जनतेशी नाळ असती तर ही वेळ आली नसती असा टोला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी हाणला. तसेच नितेश राणेंच्या केसरकरांवरील वक्तव्यावरून आतला गेम दिसत आहे‌. मात्र, यात गेम कुणाचा होतो ? हे बघावं लागेल असाही टोला त्यांनी हाणला. 

श्री. राऊळ म्हणाले, जनतेचा विकास करण्यात कमी पडल्याने सर्वप्रथम प्रचारसभा घेण्याची वेळ भाजपवर आली आहे. आमच्या उमेदवार सीमा मठकर नगराध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात आहेत. जनतेचा प्रतिसाद त्यांना मिळतो. हाकेला साथ देणाऱ्या आमच्या उमेदवार आहेत. त्यांचा विजय निश्चित आहे. याची दखल भाजपला घ्यावी लागली. तर दीपक केसरकर यांच्यावर विकास न केल्याने पक्षातून हद्दपार केल्यासारखी परिस्थिती आहे‌. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हाप्रमुख संजू परब यांना फोन करत असल्याने त्यांच राजकीय वजन कमी होत चालल्याचे दिसत. केसरकर समर्थकांची तिकीट यात कापली गेलीत असा टोला हाणला.‌

दरम्यान, पालकमंत्री नितेश राणेंच्या वक्तव्यावरून आतला गेम दिसत आहे‌. मात्र, यात गेम कुणाचा होतो हे बघावं लागेल. रविंद्र चव्हाण सांगतील तेव्हा केसरकर व्यासपीठावर उपस्थित राहतील असं ते सांगतता. यामुळे यात गेम कुणाचा होणार ? हा मुद्दा आहे. विकासाच्या मुद्यावर हे केवळ दिशाभूल करत आहेत. संजू परब देखील भाजपाचे नगराध्यक्ष म्हणुन बसले होते. त्यामुळे इथली जनता नक्की इतिहास घडवेल. धनशक्ती विरोधात जनशक्तीचा विजय दिसून येईल. राजघराण्याचा आदर करतो. मात्र, निवडणूकीला निवडणूकी प्रमाणे बघतो. पालकमंत्र्यांनी राजघराण्याला खासदार, आमदार म्हणून घेत मंत्रीपद द्याव व शहराचा विकास करून घ्यावा असा सल्ला त्यांनी दिला आहे‌. यावेळी उबाठा शिवसेनेचे संघटक निशांत तोरसकर उपस्थित होते.