
सावंतवाडी : जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या लोकांना मतदारांनी येणाऱ्या निवडणुकीत जागा दाखवून द्यावी. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा गेली दहा वर्षे शिवसेनेच्या ताब्यात आहे. या आधीही शिवसेनेचे आमदार इथे होते. राष्ट्रवादीच्या तुलनेत शिवसेनेच्या ताब्यात हा मतदारसंघ अधिक होता. त्यामुळे आम्हाला ही जागा मिळावी यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे प्रमुख मागणी राहिल असं मत उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, जनतेच्या कर्तव्याची जाणीव स्थानिक आमदारांनी ठेवावी. केवळ पार्टनरशीपसाठी स्वकीयांच्या भल्यासाठी काम मंत्री दीपक केसरकर यांनी करू नये. जनतेच्या व्यथा जाणून घेऊन आमदाराची कर्तव्य पार पाडावी. तर राजन तेली यांनी केसरकरांची तक्रार करताना राज्यात सत्ता असताना भाजपने मतदारसंघासाठी काय केलं ? हे देखील सांगावं. त्यामुळे सर्वसामान्य जनतेन येणाऱ्या विधानसभेत या लोकांना जागा दाखवून द्यावी असं मत उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी व्यक्त केल..
दरम्यान, हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडणार का ? असा सवाल केला असता ते म्हणाले, हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. आमचा आग्रह असेल उबाठा शिवसेनेच्या वाट्याला हा मतदारसंघ यावा. तशी अशी मागणी आम्ही वरिष्ठांकडे करू, दहा वर्ष शिवसेनेचा आमदार इथे आहे. त्याआधीही होता, राष्ट्रवादीच्या तुलनेत शिवसेनेचा आमदार अधिक काळ आहे. महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याचा आम्ही प्रचार करू. मात्र, आम्हाला प्राधान्य द्यावं यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे आमची प्रमुख मागणी राहिलं असं मत त्यांनी व्यक्त केल. यावेळी उबाठा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा आदी उपस्थित होते.