
सावंतवाडी : तीन वेळा आमदार होऊन मतदारसंघात रेकॉर्ड करणाऱ्या शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर बोलण्याची रूपेश राऊळ यांची उंची नाही. त्यांनी थोडं थांबाव, लवकरच कुणाची किती ताकद आहे हे त्यांना दिसून येईल असा पलटवार बाळासाहेबांची शिवसेना गटाचे तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांनी केला. तर तालुक्यात ६० सदस्य व ९ हून अधिक सरपंच हे आमचे आहेत असा दावा त्यांनी केला. रूपेश राऊळ यांनी जरा थांबावं, तुमच्या सोबत किती आहेत ते कळेलच. गावांच्या विकासासाठी रूपेश राऊळ एक रूपयांचा निधी देऊ शकतात का ? हे त्यांनी जाहीर करावं नंतर मंत्री केसरकर यांच्यावर बोलाव.
दरम्यान, मित्रपक्षांतील काही लोकांना आमदारकीची स्वप्न पडू लागली आहेत. मोती तलाव येथील काल झालेल्या कार्यक्रमास बोलवलं नाही अस त्यांच म्हणनं आहे. परंतु, निमंत्रण हे भाजप नेते व पदाधिकाऱ्यांना दिल होत. निमंत्रण देऊन देखील ते उपस्थित राहीले नाहीत. निमंत्रण देऊन आले नाही, यात आमचा दोष नाही. त्यांनी जरूर आमदार व्हावं पण, दीपक केसरकर यांच्यावर नाहक टीका करून आमदार होण शक्य नाही हे देखील ध्यानात ठेवावं असा सल्लाही बबन राणे यांनी दिला.
यावेळी शहरप्रमुख बाबु कुडतरकर, गजानन नाटेकर, राजन रेडकर, विशाल बांदेकर, नंदू शिरोडकर आदी उपस्थित होते.