तळवडेतील आग लागून बेचिराख झालेल्या मांगराची रुपेश राउळ यांनी केली पाहणी

Edited by: विनायक गावस
Published on: June 15, 2023 14:47 PM
views 126  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथे शेत मांगराला आग लागून मांगर बेचिराख झाला. याची पाहणी शिवसेना ठाकरे  गटाचे सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पाहणी केली. 

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे खेरवाडी येथे  शेतमांगराला हि आग लागली. यात लाखो रुपयाचे नुकसान झाल. ही घटणा बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास घटना घडली. या आगीत मांगराच्या छपरासह आतील सामान जळून खाक झाल्यामुळे शेतकरी कृष्णा भगवान परब यांचे लाखोंचे नुकसान झाले. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

त्यानंतर सावंतवाडी पालिकेच्या अग्निशमन  बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेची पाहणी   ठाकरे गटाचे सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केली. यावेळी शिवसेना पदाधिकारी प्रशांत बुगडे, विलास परब, तळवडे विकास सेवा सोसायटी अध्यक्ष आपा परब तसेच कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.