
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या संघटकपदी रूपेश पावसकर यांची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्गात शिवसेना वाढीसाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याची पहिली प्रतिकीया या निवडीनंतर कोकणसादशी बोलताना रूपेश पावसकर यांनी दिली आहे. रूपेश पावसकर हे शिवसेनेचे डॅशिंग आणी उमदे युवा नेतृत्व आहे. कुडाळचे धडाडीचे कार्यकर्ते म्हणूनही रुपेश पावसकर यांची ओळख आहे. वेंगुर्ले तालुका शिवसेना पक्ष कार्यालयात रूपेश पावसकर यांचे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले आहे.
कुडाळचे धडाडीचे कार्यकर्ते रूपेश पावसकर यांना अलिकडेचे मुंबई सह्याद्री बंगल्यावर येथे राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवसेनेत जाहिर प्रवेश केला होता. शिवसेना नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुचनेनुसार पक्षाचे प्रवक्ते शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिवसेना नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत, पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी रूपेश पावसकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या संघटकपदी निवड जाहिर केली आहे. या निवडीनंतर वेंगुर्ले तालुका शिवसेना पक्ष कार्यालयात रूपेश पावसकर यांचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. यावेळी शिवसेनेचे वेंगुर्ला तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, कुडाळमधील मुख्यमंत्री मदतनिधी कक्षाचे कुडाळ तालुका प्रमुख अरविंद करलकर आदी उपस्थित होते.