
सिंधुदुर्गनगरी : 'आम्ही साहित्यप्रेमी'च्या मेच्या मासिक कार्यक्रमात शनिवारी ३१ मे रोजी मानसोपचार तज्ञ आणि लेखक डॉ. रुपेश पाटकर यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. 'लेखकाशी गप्पागोष्टी' याअंतर्गत ओरोस, जैतापकर कॉलनी येथील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात सायं. ५ वाजता मुलाखतीद्वारे गप्पा आणि प्रश्नोत्तरे असा हा कार्यक्रम असेल. 'घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग'प्रणित 'आम्ही साहित्यप्रेमी' या साहित्यिक व्यासपीठाचा हा चवथा कार्यक्रम आहे. बांदा येथील मानसोपचार तज्ञ, कार्यकर्ते, लेखक आणि एक संवेदनशील व्यक्तीमत्व डॉ. रुपेश पाटकर यांना रसिक या उपक्रमात भेटणार आहेत. एका आगळ्यावेगळ्या व्यक्तीमत्वाला भेटून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात होणार आहे. मुलाखतीनंतर श्रोत्यांशी प्रश्नोत्तरे होणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचे आवाहन समन्वयक सतीश लळीत व डॉ. सई लळीत यांनी केले आहे.