रूपा मुद्राळे यांची समाजिक बांधिलकी

Edited by: विनायक गांवस
Published on: June 28, 2025 19:06 PM
views 151  views

सावंतवाडी : सामाजिक बांधिलकीच्या रूपा गौंडर (मुद्राळे) यांच्याकडून सावंतवाडी रुग्णालय नेत्र विभागाला पाच स्टूल भेट स्वरूपात देण्यात आले. एका निराधार पेशंटला डोळे तपासायला नेले असता तेथील रांगेत असलेल्या वृद्ध व्यक्तींना खूप वेळ उभे राहिले हे पाहून त्यांनी हा उपक्रम राबविला.

पाच स्टूल खरेदी करत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय नेत्र विभागाचे डॉ. शुभजीत धुरी यांना सुपूर्त केली. यावेळी डॉक्टर धुरी यांनी रूपा गौंडर यांचे आभार मानले. याप्रसंगी डॉक्टर शुभजीत धुरी, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा गौंडर, लक्ष्मण कदम आदी उपस्थित होते.