मालवणात 'रन फॉर युनिटी'

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 30, 2025 16:08 PM
views 106  views

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आणि मालवण पोलीस ठाण्याच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त मालवण शहरात ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते ९ यावेळेत देऊळवाडा ते रेवतळे तिठा ते देऊळवाडा अशी भव्य 'रन फॉर युनिटी' एकता दौड आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी दिली. 

या राष्ट्रीय एकात्मतेच्या जागरणात मालवण पोलीस ठाण्यातील अधिकारी-अंमलदार आणि पोलीस पाटील यांच्यासह शहरातील मालवण पत्रकार समिती, आस्था ग्रुप, रोटरी क्लब, लायन्स क्लब, मातृत्व आधार फाउंडेशन, ग्लोबल रक्तदाते, स्वराज्य संघटना, पाटीदार समाज, डॉक्टर फॅटर्निटी क्लब, झुंबा ग्रुप, इतर सेवाभावी संस्था व नागरिक सहभागी होणार आहेत. 

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी सर्व नागरिकांनी पांढरे टी-शर्ट आणि ट्रॅक पँट अशा पेहरावात सहभागी व्हावे. या भव्य 'रन फॉर युनिटी' मध्ये सहभागी होऊन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस निरीक्षक श्री. जगताप यांनी केले आहे.