
सावंतवाडी : मुंबई आणि पुणे येथील बस मधून सावंतवाडी पर्यंत प्रवास करणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना सावंतवाडी येथे सोडण्यासाठी दक्षता घेतली जात आहे. तसेच ठरवून दिलेल्या भाड्यापेक्षा जास्त भाडे घेतले तर कारवाई केली जाईल असे आर टी ओ नंदकिशोर काळे यांनी म्हटले आहे.
याबाबत एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे,गौरी गणपती सणादरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील झाराप येथे सिंधुदुर्ग उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यांचे तर्फे दि. ४ ते दि. ९ सप्टेंबर या दरम्यान सकाळी पाच ते अकरा वाजेपर्यंत मुंबई व पुणे या ठिकाणाहून प्रायव्हेट बसेस मध्ये येणाऱ्या चाकरमानी जे सावंतवाडी ला जाणार आहेत त्यांना झाराप येथे सोडले तर ती बस सावंतवाडीला ला वळविण्यात येणार आहे
तसेच त्या प्रवासादरम्यान कोणत्या चाकरमान्याकडून ठरवून दिलेल्या भाड्याशिवाय अतिरिक्त भाडे घेतले असेल तर सदरील बसेस वर कारवाई करण्यात येणार आहे असे त्यांनी म्हटले आहे.