RPD चा सोहम कोरगावकर जिल्ह्यात प्रथम

Edited by: विनायक गांवस
Published on: July 10, 2025 20:33 PM
views 158  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यातर्फे दरवर्षी घेण्यात येणा-या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा   ( इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ) परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, सावंतवाडी या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. 

 इ. 08 वी च्या 03 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. त्यांमध्ये कु. सोहम बापूशेट कोरगावकर (270 गुण ) याने शहरी सर्वसाधारण विभागातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. शहरी सर्वसाधारण विभागातून  कु. साक्षी रवींद्र गुरव (218 गुण) हिने जिल्ह्यात 12 वा तर सावंतवाडी तालुक्यात 4 था क्रमांक आणि शहरी सर्वसाधारण विभागातून  कु. तन्वी प्रसाद दळवी (210 गुण) हिने जिल्ह्यात 21 वा तर सावंतवाडी तालुक्यात 8 वा क्रमांक पटकावला आहे. तसेच प्रशालेत नवीन प्रवेश घेतलेली इ. 08 वी ची कु. जान्हवी विश्वास पाटील (270 गुण ) हिने सुद्धा शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे.ग्रामीण सर्वसाधारण विभागातून कोल्हापूर जिल्ह्यात पाचवी तर चंदगड तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. याचप्रमाणे प्रशालेत नवीन प्रवेशित इ. 05 वी चा कु. पार्थ उमेश सावंत 68.00 % याने शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. शहरी सर्वसाधारण विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३८ वा तर तालुक्यात ८ वा क्रमांक पटकाविला आहे. तसेच प्रशालेत नवीन प्रवेशित इ. 05 वी चा कु. वेदांत जयराम साटेलकर  66.66 % याने शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. शहरी सर्वसाधारण विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४४ वा तर तालुक्यात १० वा क्रमांक पटकाविला आहे.

या यशस्वितेसाठी RPD प्रशालेला नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल सर्व विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षक या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकास सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर , सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत व सर्व संस्था सदस्य तसेच प्र.मुख्याध्यापक श्रीम. संप्रवी कशाळीकर , उपमुख्याध्यापक एस . एन पाटील , उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक , तसेच पालक ,शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी , पालक- शिक्षकसंघ यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.