
सावंतवाडी : शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे 'लोकगंध' वार्षिक स्नेहसंमेलनाला प्रारंभ झाला. संस्थाचालक व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरूवात करण्यात आली. यानिमित्ताने वर्षभरात चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
आरपीडीच्या 'लोकगंध' वार्षिक स्नेहसंमेलनाला प्रारंभ झाला असून वर्षभरात चमकदार कामगिरी करणाऱ्यांना गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शेला पागोटे कार्यक्रम, विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडले. एकापेक्षा एक सरस सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांत उत्साहाच वातावरण होतं. यानिमित्ताने भरविण्यात रंगावली प्रदर्शन व हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन अध्यक्ष विकास सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्था उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही.बी.नाईक, खजिनदार सी.एल.नाईक, शालेय समिती अध्यक्ष अमोल सावंत, के.टी.परब, प्रा.बाळासाहेब नंदीहळ्ळी, प्रा. सतिश बागवे, , प्राचार्य जगदीश धोंड मुख्याध्यापक, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक,उपमुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर, पर्यवेक्षक संजय पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख वनिता घोरपडे, मानसी नागवेकर, अभिषेक कशाळीकर, प्रा.माया नाईक, प्रा.मिलिंद कासार,दशरथ शृंगारे, प्रा. ठाकुर,प्रा. जोसेफ डिसिल्वा,ग्रंथपाल श्री.कोरगावकर, जीएस भावेश सापळे, एलआर पुजा राठोड, सांस्कृतिक प्रमुख ओंकार चव्हाण, मुख्यमंत्री
शुभम वरक, विद्यार्थिनी प्रतिनिधी प्रांजली कबरे, सांस्कृतिक प्रमुख भक्ती रजपूत यांसह शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे संचालक व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.