RPDची अस्मी मांजरेकर जिल्ह्यात दुसरी

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश
Edited by: विनायक गांवस
Published on: July 17, 2024 10:28 AM
views 153  views

सावंतवाडी : राजमाता सत्त्वशीलादेवी भोंसले यांच्या ६ व्या पुण्यस्मरणार्थ सिं.जि.शि.प्र. मंडळ संचलित मदर क़्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२४-२५ या स्पर्धेत आरपीडी प्रशालेच्या ०४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यापैकी मोठ्या गटातून अस्मि प्रवीण मांजरेकर हिने राजमाता सत्त्वशीलादेवी भोंसले यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व सादर केले.या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत  मोठ्या गटात २४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता‌. यात अस्मि प्रवीण मांजरेकर हिने व्दितीय क्रमांक पटकावला आहे.


 या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अस्मिचे तसेच मार्गदर्शक शिक्षकवृंद व पालकवर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकास सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड, उपमुख्याध्यापक पी.एम.सावंत , पर्यवेक्षक  श्रीम. संप्रवी कशाळीकर, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.